ऐकावं ते नवलच! मोडक्या तोडक्या खुर्च्या विकल्या 22 कोटींना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘हौसेला मोल नसते’ या म्हणीचा प्रत्यय नुकताच फ्रान्समधील नागरिकांना आला आहे. कारण 1978 मध्ये तयार केलेल्या चार अँटीक मोडक्या तोडक्या खुर्च्यांची विक्री तब्बल 22 कोटी रुपयांना झाली आहे. तसे पाहायला गेले तर या चारही खुर्च्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे. फ्रान्सचे राजा लुईस सातवे यांचा लहान भाऊ चार्ल्स पाचवा यांच्यासाठी या खुर्च्या आणि बेड पॅरिसमधील कारागिरांकडून बनवून घेतल्या होत्या. या खुर्च्यांवर विशिष्ठ निशाणी देखील आहे.

सध्या या खुर्च्या मोडक्या तोडक्या अवस्थेत असून सीट, मागचा भाग आणि पायही तुटलेले आहेत. नुकताच या खुर्च्यांचा लिलाव करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे या खुर्च्या खरेदी करण्यासाठी अनेकांनी इच्छा दर्शवली होती. हा लिलाव आर्टक्यूरिअलद्वारे करण्यात आला होता.