
पुण्यात भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जेष्ठ महिला ठार झाली असून त्यांची सुन जखमी झाली. हा अपघात 19 जूनला दुपारी अडीचच्या सुमारास कोथरूड परिसरातील गुरूद्वारा सोसायटीच्या कमानीसमोर घडला. रंजना दाभेकर (वय 60 रा. शिवकल्याणनगर, कोथरूड) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मुग्धा दाभेकर (वय 30) असे जखमी सुनेचे नाव आहे. सुहास दाभेकर (वय 53) यांनी यापकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
रंजना आणि मुग्धा या 19 जूनला दुपारी सव्वा दोनच्या सुमारास दुचाकीवरून गुरूद्वारा सोसायटी परिसरातून जात होत्या. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या सिमेंट मिक्सर चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे खाली पडल्याने रंजना आणि मुग्धा गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान रंजना यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर मुग्धा यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस उपनिरीक्षक टी. पी. पांढरे याप्रकरणी तपास करीत आहेत.



























































