वृद्ध महिलेने चपाती खाऊ घातली नाही, माकडाने असे काही केले की सोशल मीडियावर झाला हिट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माणूस आणि मुक्या प्राण्यांच्या नात्याला शब्दांचीही गरज नसते. याचे उत्तम उदाहरण देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आजारी असल्याने एक वृद्ध महिला दोन दिवस माकडाला चपाती देऊ शकली नाही म्हणून माकडाने असे काही केले आणि सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

सोशल मीडीयावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत एक माकड एका वृद्ध महिलेच्या घरात घुसतो. ही वृद्धा गेले दोन दिवस आजारी असल्याने ती अंथरुणावरच आहे. पण जेव्हा तिला तो अंथरुणावर पाहतो तेव्हा तिच्या जवळ जाऊन अगदी तिला मिठी मारतो, तिच्या पोटावर बसून तिच्याशी आपुलकी दाखवतो. तर ती वृद्ध महिलाही एखाद्या लहान बाळासारखी त्याला कुरवाळताना दिसत आहे.

ही वृद्ध महिला या माकडाला नेहमी खाऊ घालत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून ती आजारी असल्याना त्याला खाऊ घालू शकली नाही. त्यानंतर माकड तिची तब्येतीची विचारपूस करायला चक्क तिच्या घरात घुसला आणि वृद्ध महिलेजवळ जात तिला मिठी मारली. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आयएएस अधिकारी अविनाश सरन यांनी ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. या व्हिडीओ सोबत एक फोटोओळ दिली आहे, रोज सकाळी एक वृद्ध महिला माकडांना चपाती द्यायची. आजारी पडल्यामुळे दोन दिवस ती चपाती देऊ शकली नाही. तेव्हा माकडच तिच्या तब्येतीची चौकशी करायला तिच्याजवळ गेला. हृदयस्पर्शी क्षण आहे.