
एका वयोवृद्ध व्यक्तिला मसाजचं आमीष दाखवून फसवल्याची घटना जयपूर येथील मुहाना येथे घडली आहे. या आमिषामुळे सदर वृद्धाला पोलीस स्थानक गाठावं लागलं आहे.
मुहाना येथील शर्मा (66, नाव बदलले) नावाच्या वृद्धाने त्याच्या घराची एक खोली भाड्याने देण्याची जाहिरात दिली होती. ती खोली पाहायला एक तरुणी आली होती. पण, भाडं जास्त असल्यासं सांगून तिने खोलीत राहायला नकार दिला. पण, शर्मा यांच्याशी बोलताना ती एका खासगी रुग्णालयात फिजिओथेरपिस्ट असल्याचं तिने सांगितलं. त्यांना काही शारीरिक त्रास असल्यास तो दूर करण्यासाठी ती मदत करेल असं आश्वासनही तिने दिलं आमइ ती तिथून निघून गेली.
काही दिवसांपूर्वी या तरुणीचा शर्मा यांना फोन आला. तिने तिला आज सुट्टी असून जर मसाज करून घ्यायचा असेल तर ती मोफत मसाज द्यायला तयार आहे, असं शर्मा यांना सांगितलं. शर्मा यांनी त्यासाठी तयारी दर्शवली आणि ते तिने दिलेल्या पत्त्यावर गेले.
तिथे तिने शर्मा यांना अंतर्वस्त्र वगळून उर्वरित सगळे कपडे काढायला सांगितले. मसाज टेबलवर झोपवून ती त्यांना म्हणाली की, मी असा मसाज करेन की तुम्हाला लक्षात राहील. तेवढ्यात त्या खोलीचं दार उघडून तिचा नवरा आत आला.
त्याने शर्मा यांना धमकवायला सुरुवात केली. 10 लाख रुपये द्या, अन्यथा तुमचे माझ्या बायकोशी संबंध असल्याचं व्हायरल करेन, अशी धमकी त्याने दिली. शर्मा यांनी तिथून काढता पाय घेतला. मात्र, त्यानंतरही धमक्या सुरूच राहिल्या. अखेर शर्मा यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. शर्मा यांना या प्रकाराने धक्का बसला आहे.




























































