
लिफ्टमध्ये अडकल्यावर अनेकांना घाम फुटतो, भल्याभल्यांची घाबरगुंडी उडते. कधी बाहेर पडतो असे होते, अशातच एक वृद्ध महिला एक दोन तास नव्हे तर तब्बल सहा दिवस लिफ्टमध्ये अडकून पडली होती.आश्चर्य म्हणजे तिच्या कुटुंबियांना याबाबत काहीच माहिती नव्हते. या वृद्ध महिलेने सगळ्यात जास्त वेळ लिफ्टमध्ये अडकून राहिल्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदही झाली.
ही घटना 28 डिसेंबर 1987 मध्ये घडली आहे. ज्यावेळी संपूर्ण जग नव्या वर्षाचा जल्लोष साजरा करत होते. सायप्रस येथील लिमासोसच्या किवली पापजॉन एका लिफ्टमध्य अडकली होती. महिला चार दिवस आपल्या शॉपिंग बॅगमध्ये असलेली फळ भाज्या ब्रेड खाऊन राहत होती आणि पाण्याशिवाय राहत होती. किवली या किराणाचे सामान आणण्यासाठी घरातूुन बाहेर पडली होती. तिचा फ्लॅट अपार्टमेण्टच्या तिसऱ्या फ्लोअरवर होता. मात्र परतताना लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर अडकली. या दरम्यान महिलेने मदतीलाठी अनेकदा आरडा ओरड केला. मात्र कोणापर्यंत तिचा आवाज पोहोचला नाही.
वृत्तानुसार, किवली या शक्यतो कमी खाण्याचे प्रयत्न करत होते. कारण ती टॉयलेटला जाऊ शकत नव्हती. मात्र अशक्तपणा जाणवायला लागला. मात्र तरीही तिने जास्त काही खा्ल्ले नाही. कारण महिलेला माहित होते की, फळं -भाज्यामुळेच ती जीवंत राहू शकते. अखेर 2 जानेवारी 1988 साली तिला लिफ्टमधून काढण्यात आले. महिलेने माध्यमांना सांगितले की, ती काहीवेळासाठी पाफोसला जाणार होती. त्यामुळे कुटुंबातील कोणीच तिला शोधण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र ज्यावेळी तिच्या भाजीला कळले की किवली पाफोसला पोहचली नाही, त्यावेळी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. या अपघाताच्या 8 वर्षानंतर किवली यांचे निधन झाले.
























































