इंग्लंडविरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सुरू असलेल्या तीसऱ्या कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडच्या युवा कर्णधार ओली पोपने शतक ठोकत इतिहास रचला आहे. Kennington Oval मध्ये सुरू असलेल्या या सामन्यात ओली पोपच्या बॅटमधून त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतले सातवे शतक आले. या शतकासोबत त्याने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
Ollie Pope ने संयमी खेळी करत 102 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 103 धावांची खेळी केली. ओली पोपच्या शतकामुळे इंग्लंडने पहिल्या डावात 3 गड्यांच्या मोबदल्यात 221 धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या दिवसा अखेर ओली पोप (103 धावा) आणि हेरी ब्रुक (8 धावा) नाबाद खेळत आहेत. पहिल्या डावात ओली पोपने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सातवे शतक ठोकले. विशेष म्हणजे त्याने 7 शतके 7 वेगवेगळ्या देशांविरूद्ध ठोकली आहेत.
क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे की, एखाद्या खेळाडूने 7 शतके 7 वेगवेगळ्या देशांविरूद्ध ठोकली आहेत. या सातव्या शतकासोबत ओली पोप कसोटी क्रिकेटच्या इतिहासात वेगवेगळ्या देशांविरुद्ध सात शतके ठोकणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध सातवे शतक करण्यापूर्वी पहिली 6 शतके अनुक्रमे दक्षिण आफ्रिका, न्युझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, हिंदुस्थान आणि वेस्टइंडिज या देशांविरूद्ध शतकीय पारी खेळली आहे.
त्याचबरोबर ओली पोप हा इंग्लंडचा कर्णधार म्हणून वेगवान शतक ठोकणारा दुसरा युवा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार असताना ग्राहम गूच याने 1990 साली टीम इंडियाविरुद्ध 95 चेंडूंमध्ये शतक ठोकले होते.