ऑलिम्पिक तयारी करणाऱ्या खेळाडूंचे नुकसान होऊ देणार नाही – क्रीडामंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
अरुणाचल पश्चिममधून निवडून आलेले गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनाही मोदी 2.0 मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळाली आहे.

हिंदुस्थानात कोरोना वाढतच चालला आहे. परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. अशा परिस्थितीतही ऑलिम्पिकची तयारी करीत असलेल्या खेळाडूंच्या सराव शिबिराला कात्री देण्यात येणार नाही, त्यांचे नुकसान होऊ देणार नाही असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले मत व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन पुढल्या वर्षी करण्यात येणार आहे. त्याआधी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्यांना किंवा या स्पर्धेची तयारी करीत असलेल्या खेळाडूंना चांगला सराव करायला मिळायला हवा. इतर देशांतील खेळाडूंनी केलेल्या सरावाच्या तुलनेत ते मागे पडायला नकोत. त्यामुळे कॅम्पचे आयोजन कुठल्याही परिस्थितीत केले जाईल, पण सरावासोबतच खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्यही दिले जाणार आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

राष्ट्रीय क्रीडा संघटनांना मान्यता मिळेल

काही राष्ट्रीय क्रीडा संघटनांनी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे त्यांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. याबाबतचे प्रकरण कोर्टात गेले असून लवकरच यावर सुनावणी होईल. अशा संघटनांनी लवकरात लवकर दुरुस्ती करावी असे सरकारकडून त्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे केंद्राकडून अशा संघटनांना मान्यता देण्यात येईल, असे किरण रिजिजू यावेळी म्हणाले.