… तर फासावर लटकवले असते, ओमर अब्दुल्लांच्या विधानावर साध्वी प्रज्ञा कडाडल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भोपाळ येथून भारतीय जनता पक्षाने साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना लोकसभा उमेदवारी देण्यात आल्यानंतर जम्मू-कश्मरीचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी टीका केली. निवडणूक लढण्यासाठी साध्वी प्रज्ञा यांची तब्येत बरी आहे का? बरी असेल तर त्यांना पुन्हा तुरुंगामध्ये टाका असे ट्वीट ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे. तसेच भाजपने साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी देऊन कायदा-सुवस्थेची धिंदवडे काढल्याचेही ते म्हणाले. त्यांच्यावर ट्रायल सुर असून तब्येतीच्या कारणामुळे जामिनावर बाहेर असल्याचे अब्दुल्ला यांनी पुढे नमूद केले. अब्दुल्ला यांच्या टीकेला साध्वी प्रज्ञा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

ओमर अब्दुल्ला यांच्यावर पलटवार करताना साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, बरे झाले ओमर अब्दुल्ला साध्वीला फासावर लटकवले पाहिजे असे नाही म्हटले, कारण हेच त्यांचे कारस्थान होते. ओमर अब्दुल्ला यांनी अधिक माहिती घ्यायला हवी की, मला तब्येतीच्या कारणामुळे जामीन मिळालेला नाही.

दरम्यान, बुधवारी साध्वी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर काही तासांतच त्यांना भाजपकडून भोपाळ मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. या मतदारसंघातून त्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना काँटे की टक्कर देणार आहेत.