ओमायक्रोनणमुळे देशात येणार कोरोनाची तिसरी लाट?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण जगात कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट ओमायक्रोनच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. हा व्हेरिएंट सर्वातआधी दक्षिण आफ्रकेत सापडला होता. जागतिक आरोग्य संघटनेने याला ‘व्हेरिएंट ऑफ कॉन्सर्न’च्या यादीत ठेवलं आहे. आता या नवीन व्हेरिएंटचा हिंदुस्थानातही शिरकाव झाला आहे. कर्नाटकात ओमायक्रोनचे दोन रुग्ण सापडले आहेत. केंद्र सरकारने SARS-CoV-2 आणि Omicron प्रकारांवर विचारल्या जाणार्‍या बहुतेक प्रश्नांची उत्तरे देणारा दस्तऐवज जारी केले आहे.

ओमायक्रोन हा SARS-CoV-2 चा एक नवीन प्रकार आहे. जो अलीकडेच दक्षिण आफ्रिकेत सापडला होता. 24 नोव्हेंबर रोजी त्याचे नाव बदलून B.1.1.529 आणि नंतर Omicron असे करण्यात आले. यामध्ये 30 हून अधिक उत्परिवर्तन आढळले आहेत. जे रोगप्रतिकारक शक्तीला लक्ष करतात. दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या बाबतीत झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता, WHO ने याला चिंताजनक प्रकारांच्या यादीत ठेवले आहे.

ओमायक्रोनमुळे येणार तिसरी लाट?

दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रोनची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत आणि याची तीव्रता पाहता हिंदुस्थानसह बहुतेक देशांमध्ये हा पसरण्याची शक्यता आहे. याचे रुग्ण किती प्रमाणात वाढणार, तसेच याचे कोणते गंभीर लक्षणे समोर येऊ शकतात, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. असे असले तरी हिंदुस्थानात लसीकरणाची गती पाहता, याचा देशात कमी परिणाम होईल, असे बोलले जात आहे. याबाबत अद्याप आणखीन माहिती समोर येणार असल्याने याच्या तीव्रतेचा अंदाज आताच लावता येणार नसल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.