
आता पुन्हा एकदा नितीन गडकरी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. कोणाचा वापर करून त्या व्यक्तीला कधीच फेकून देऊ नका, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
गडकरी म्हणाले, चांगले दिवस असो अथवा वाईट दिवस तुम्ही जर एखाद्या व्यक्तीचा हात पकडला तर तो कधीच सोडू नका. फक्त उगवत्या सूर्याचीच नाही तर जो सूर्य मावळतो आहे त्याचीदेखील पूजा करणे आवश्यक असते. गडकरी यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी आपल्या मनातील खदखद क्यक्त केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
उद्योजकांशी संवाद साधताना गडकरी यांनी रिचर्ड निक्सनचे उदाहारण देत म्हटले की, एखादी व्यक्ती तेव्हा संपत नाही जेव्हा तो हारतो. व्यक्ती तेव्हा संपतो जेव्हा तो प्रयत्न करणे सोडून देतो, असेही गडकरी यांनी सांगितले






















































