
रत्नागिरीत एका दीड वर्षाच्या बाळासह त्याच्या आईला तर गुहागरात एका आरोग्य कर्मचार्याला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 459 वर पोहोचला आहे.
बुधवारी रात्री उशीरा 10 अहवाल पॉझिटीव्ह आले असून जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 459 वर जाऊन पोहोचली आहे. कळंबणी रूग्णालयातील 5, रत्नागिरी रूग्णालयातील 2, गुहागर 1 तर देवरूख 2 असे मिळून 10 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
बरे झालेल्या 9 रूग्णांना आज घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात बरे झालेल्या रूग्णांची संख्या आता 343 वर पोहचली असून बरे होण्याचे प्रमाण 74 टक्के आहे. सध्या 100 रूग्णांवर उपचार सुरू असून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. आज सापडलेल्या पॉझिटिव्ह अहवालात दोन रूग्ण शहरातल्या कोकणनगर, रत्नागिरी भागातील आहेत तर एक रुग्ण श्रृंगारतळी, गुहागर येथील आहे. इतर 7 रुग्णांपैकी खेड तालुक्यातील शिवतर येथील एक रुग्ण, दोन रुग्ण तळे, कासारआडी, एक रुग्ण कर्टेल तर एक रुग्ण खवटी आणि देवरुख- संगमेश्वर तालुक्यातील साडवली व कडवई येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. रत्नागिरी शहरातील कोकणनगर हा परिसर कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून जाहिर करण्यात आला आहे.






























































