घराजवळ खेळताना नाल्यात पडला, चिमुरड्याचा मृत्यू; मृतदेह 600 मीटर अंतरावर सापडला

583

घराजवळ खेळत असताना नाल्यात पडून वाहत गेलेल्या दीड वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह तब्बल 600 मीटरवर नदीपात्रात आढळून आला. बुधवारी दत्तवाडी परिसरात रक्षालेखा सोसायटीजवळ दीड वर्षाचा चिमुरडा नाल्यामध्ये पडून बेपत्ता झाला होता. कालपासून अग्निशमन दलाच्या जवानांकडून त्याचा शोध सुरू होता. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला. संस्कार सुर्यकांत साबळे (वय दीड वर्षे) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे.

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दत्तवाडीतील रक्षालेखा सोसायटीजवळ खेळताना बुधवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संस्कार नाल्यातील पाण्यात पडला होता. त्यानुसार एरंडवणा अग्निशमन केंद्राची गाडी घटनास्थळी पोहोचली. जवानांनी नाल्यातील पाण्यात तब्बल दोन तास चिमुरड्याचा शोध घेतला. पण, संस्कार सापडला नसल्याने अंधार झाल्यामुळे शोधमोहिम थांबविण्यात आली होती.

गुरुवारी सकाळी सात वाजता अग्निशमक दलाकडून संस्कारला शोधण्यास सुरुवात केली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह नाल्यापासून 600 मीटर अंतरावरील नदीपात्रात आढळून आला. ही माहिती अग्निशम दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या