
सामना ऑनलाईन । जम्मू
जम्मू कश्मीरमधील सोपोर भागात लष्कराच्या एका जवानाची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. मोहम्मद रफी यातू असे त्या शहीद जवानाचे नाव असून त्याच्या कुटुंबीयासमोर त्याची हत्या करण्यात आली. रफी हा सुट्टीसाठी त्याच्या सोपोरमधील वारपोरा गावी आला होता.
#JammuAndKashmir: One Army personnel Mohd Rafi Yatoo shot dead by terrorists in Warpora area of Sopore. pic.twitter.com/NVr4wNSTjo
— ANI (@ANI) April 6, 2019
काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी कश्मीर खोऱ्यात एका महिला पोलीस अधिकारीची गोळ्या घालून हत्या केली होती. तर 8 मार्चला दहशतवाद्यांनी बडगाम जिल्ह्यातील एका नुकत्याच लष्करात भरती झालेल्या जवानाची हत्या केली होती.


























































