
सामना ऑनलाईन । मुंबई
रात्रीच्या वेळेस लोकल सिग्नलच्या खांबावर चढून महिला प्रवाशांचे मोबाईल आणि बॅगा चोरणाऱ्या तौसिफ सरफुद्दीन अन्सारी आणि जाफर हुसेन शेख यांना रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गजाआड केले. तेरा दिवसांपूर्वी मध्य रेल्वेच्या नाहूर आणि मुलुंड स्थानकांदरम्यान फटका गँगने प्रवाशांचे मोबाईल चोरले होते. मध्य रेल्वेचे पोलीस उपायुक्त एम. मकानदार यांच्या मार्गदर्शनखाली सहायक आयुक्त मच्छिंद्र चव्हाण, विनय गाडगीळ, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक संतोष धनवटे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल कारभारी, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश दीक्षित, पोलीस हवालदार सतीश क्षीरसागर, श्रीकृष्ण चव्हाण, प्रकाश चौगुले, पोलीस नाईक प्रवीण घार्गे, दीपक शिंदे, पोलीस शिपाई जयेश थोरात, सतीश फडके यांनी तपासाआधारे तौसिफ आणि जाफरला ताब्यात घेतले.

























































