किरकोळ कारणावरून मोटारीची काच फोडली, एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टोल नाक्यावर मोटार मागे-पुढे घेण्याच्या वादातून दोघाजणांनी तरूणाच्या मोटारीचा पाठलाग करून काच फोडली आहे. ही घटना काल पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास कात्रज बायपासनजीक घडली. आकाश विनोद शिरोळे (वय 22, रा. दत्तनगर, आंबेगाव ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.  याप्रकरणी रोणीत वाघ  (वय 28, रा. कोपरगाव, नगर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास रोणीत खेड-शिवापूर टोलनाक्यावरून पुण्याकडे येत होते. त्यावेळी मोटार मागे-पुढे घेण्यामुळे त्यांची आकाशशी वादावादी झाली. त्याचा राग आल्यामुळे आकाशने मोटारीचा पाठलाग करून साथीदाराच्या मदतीने रोणीतच्या मोटारीची काच फोडून नुकसान केले आहे. याप्रकरणी आरोपीला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे.