गुंड ‘चॉकलेट’ला दोन पिस्तुलांसह अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

‘चॉकलेट’ नावाने कुप्रसिद्ध असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट-१ने अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तुले आणि चार काडतुसे जप्त केली आहेत.

सुनील ऊर्फ चॉकलेट सुन्या किशोर डोकेफोडे (वय ३३, रा. पर्वती पायथा) याला अटक केली आहे. चॉकलेट हा पर्वती पायथा येथे पिस्तुले घेऊन थांबल्याची माहिती पोलीस नाईक सचिन जाधव यांना मिळाली. त्यानुसार त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. चॉकलेटवर तब्बल २५ गुन्हे दाखल आहेत.

तो सतत जागा बदलून राहत असल्याने त्याचा शोध पोलिसांना घेता येत नव्हता. उपनिरीक्षक हर्षल कदम, दिनेश पाटील, पोलीस नाईक सचिन जाधव, इम्रान शेख, इरफान मोमिन, श्रीकांत वाघवले, सुधाकर माने, हवालदार रिजवान जिनेडी, सुभाष पिंगळे, प्रशांत गायकवाड, उमेश काटे, अशोक माने, तुषार खडके, संजय बरखडे, शिपाई तुषार माळवदकर, गजानन सोनुने यांनी ही कारवाई केली.