अमरावती एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू; बळींची संख्या 14 वर

448

अमरावतीतील कोविड रुग्णालयात 30 वर्षांच्या कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे दगावणार्‍यांची संख्या 14 झाली आहे. शुक्रवारी सकाळी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 141 वर पोहोचली आहे. त्यात मशानगंज येथील 50 वर्षीय महिला व लालखडी येथील 19 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेलातरूण शहरातील पाटीपुरा भागातील रहिवासी असून त्याला 15 मे रोजी कोविड रुग्णालयात भरती करण्यात आले होते. याचा अहवाल 16 तारखेला पॉझिटिव्ह आला. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून त्याची प्रकृती खालावली होती. उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. अमरावतीत एकूण 141 रुग्णांपैकी 14 जणांचा मृत्यू झाला असून 66 जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. तर दोनजणांना नागपूरला उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तर उर्वरित कोरोना रुग्ण येथील कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या