
सामना ऑनलाईन । सांगली
सांगलीच्या इस्लामपूरमध्ये एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या. या सर्व 500 रुपयांच्या नोटा आहेत. नोटा बदलण्यासाठी तिघेजण आले असता पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. इतक्या मोठय़ा प्रमाणात जुन्या नोटा आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शहरातील एसटी स्टँडवर छापा घालून इस्लामपूर पोलिसांनी ही कारवाई केली. तिन्ही आरोपी वाळवा तालुक्यातील किल्ले मच्छिंद्रगड येथील आहेत. इस्लामपूरमध्ये हे आरोपी नोटा बदलण्यासाठी येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून तिघांनाही पकडले. 99 लाख 97 हजारांची एकूण रक्कम आहे. या नोटा कुठून आल्या, कुणी आणल्या याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.




























































