दुभाजकावर आदळल्याने कारचा स्फोट, एकाचा होरपळून मृत्यू

कार दुभाजकावर आदळल्याने कारचा मोठा स्फोट होऊन कारला लागलेल्या आगीत एकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २५ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली.

सोनखेड पासून तीन किलोमीटर अंतरावर नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्ग ३६१ वर २५ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान नांदेडहून लोह्याकडे भरधाव वेगात जाणारी कार वंदना पेट्रोल पंपा जवळ ताबा सुटलेने दुभाजकावर चढताच क्षणार्धात ही कार आगीच्या भक्षस्थानी सापडली त्यामध्ये नांदेड येथील रहिवासी असलेला एक जण जागीच मृत्यू पावला आहे.

सदरिल घटना समजतात सोनखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पांडुरंग माने यांनी लोहा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करून आग विझवली व विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.