
सामना प्रतिनिधी । चंद्रपूर
चीचपल्ली रेंजमधील चिंचाळा बिटमध्ये वाघाने केलेल्या हल्ल्यात गुराख्यासह दोन बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मारोती पुट्टावार ( 65) असे ठार झालेल्या गुराख्याचे नाव आहे. मारोती मूल तालुक्यातील येरगाव येथील रहिवासी असून ते गावातील बकऱ्यांना चरण्यासाठी जंगलात घेऊन गेले होते. त्यावेळी वाघाने हल्ला करून मारोती यांना ठार केले आणि दोन बकऱ्यांचाही फडशा पाडला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.




























































