पाकिस्तानमध्ये कोरोनाचा पहिला बळी, 184 जणांना लागण

1580

चीन, युरोप आणि हिंदुस्थाननंतर आता पाकिस्तानमध्येही कोरोनचा प्रादुर्भाव झाला आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला असून 184 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. लाहोरमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. हा रुग्ण हफीजाबादचा रहिवासी होती.

फक्त 24 तासात पाकिस्तानमध्ये कोरोनाचे 130 हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहे, त्यामुळे संपूर्ण देशात भितीचे वातावरण आहे.

ज्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तो इराणहून परतला होता. हा रुग्ण सीमेवारील इस्पितळात 14 दिवस निगराणीखाली होता. परंतु लाहोरच्या एका इस्पितळात त्याचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात कोरोनाचे तब्बल 155 रुग्ण आढळले आहेत.

गेल्या एक आठवड्यापासून कोरोना लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. पहिल्या आठवड्यात पाकिस्तानात 33 रुग्ण सापडले आहेत. फक्त सोमवारी 133 रुग्ण आढळले होते. त्यामुळे रुग्णांची संख्या 184 वर गेली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने पाकिस्ताने विदेशी पर्यटकांना बंदी घातली आहे. बुधवारी ही बंदी लागू होणार असून 3 एप्रिलपर्यंत ही बंदी असणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या