जम्मू कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

जम्मू कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे, या हल्ल्यात एक सीआरपीएफचा जवान शहीद झाला आहे.

आज श्रीनगरच्या परीम पोरा भागात दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आले आहे. तसेच एक दहशतवादी जखमी झाला असून जवानांनी त्याला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या