जमावाकडून एकाचा खून, आष्टी तालुक्यातील फत्तेवडगाव येथील घटना

502

आष्टी तालुक्यातील फत्तेवडगाव येथे चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका व्यक्तीस गावातील काही नागरिकांनी पकडून बेदम मारहाण केली, यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती की, तालुक्यातील फत्तेवडगाव येथे आलीस उर्फ विशाल नारायण भोसले (वय 34, रा.पुडी ता.आष्टी) हा चोरी करण्याच्या उद्देशाने फत्तेवडगाव येथे रविवारी मध्यरात्री आला होता. तेव्हा गावातील काही व्यक्तींनी त्याला पाहिले आणि एकत्र येऊन त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती समजताच पोलीस उपविभागीय अधिकारी विजय लागरे, पोलीस निरीक्षक माधव सूर्यवंशी यांच्याकडे सह आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून घटनेचे कारण स्पष्ट झाले नाही. आष्टी पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या