महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेच्या तपासणीसाठी एक सदस्यीय समितीची स्थापना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भात वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असणार आहे. ही समिती एका महिन्याच्या मुदतीत या दुर्घटनेबाबतचा अहवाल सादर करणार आहे.

खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी आलेल्या 14 श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी- दक्षता घ्यावी, याबाबतही समिती शासनास शिफारशी करेल.