ब्राह्मण नागरी पतसंस्थेत 11 कोटींचा अपहार करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

सेवाभावी ब्राह्मण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण या पतंस्थेमध्ये बोगस कर्जखाते आणि खोट्या सह्या करून अपहार केल्याप्रकरणी तसेच पिग्मी खात्यावरील रक्कम ठेवीदारांकडून स्विकारून ती रक्कम पतसंस्थेत जमा न करता एकूण 11 कोटी 72 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दीड वर्षापासून फरारी असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे.

सेवाभावी ब्राह्मण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण या पतंस्थेमध्ये बोगस कर्जखाते आणि खोट्या सह्या करून अपहार केला. तसेच पिग्मी खात्यावरील रक्कम ठेवीदारांकडून स्विकारून ती रक्कम पतसंस्थेत जमा न करता 11 कोटी 72 लाख रुपयांचा अपहार करून आरोपी राजेंद्र वसंत लोवलेकर, रा.चिपळूण हा गुन्हा घडल्यानंतर फरारी झाला होता. त्याचा गुन्हा 31 जानेवारी 2018 रोजी दाखल करण्यात आला होता. सुमारे दीड वर्षांपासून राजेंद्र लोवलेकर आरोपी पोलीसांना सापडत नव्हता. तसेच त्याने दीड वर्षात आपल्या कुटुंबाशी संबंध ठेवला नव्हता. पोलीस अधीक्षक डॉ़.प्रवीण मुंढे यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे एक विेषेश पथक तयार करून मुंबई, पुणे या ठिकाणी आरोपीचा शोध सुरू ठेवला. आरोपीच्या वास्तव्याबाबत कोणतीही माहिती नसताना या पथकाने या गुन्ह्यातील आरोपी राजेंद्र लोवलेकर याला ताब्यात घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या