कोथरूडमध्ये सराईताकडून पिस्तूलासह दोन राउंड जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोथरूडमधील आयटी पार्क परिसरात थांबलेल्या एका सराईताकडून गुन्हे शाखेने पिस्तूलासह दोन राउंड जप्त करण्यात केले आहेत. अजय शंकर सुतार (वय 20, रा.टिळेकरनगर, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

सराईत अजय सुतार शस्त्रासह लोहिया जैन आयटी पार्कसमोर उभा असल्याची माहिती पोलीस हवालदार राजेंद्र मारणे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून सराईत अजयला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूलासह दोन जिंवत काडतुसे असा 41 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी सुरेंद्रनाथ देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, एपीआय अमृता चवरे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, राजेंद्र मारणे, संतोष क्षीरसागर, एकनाथ कंधारे, हनुमंत गायकवाड, रामदास गोणते, संदीप तळेकर, सुजीत पवार, भाग्यश्री वाघमारे यांनी केली.