आष्टीत टेम्पोखाली चिरडून हमालाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कापसाने भरलेला टेम्पो वजन करून पाठीमागे घेत असताना टेम्पोखाली चिरडून हमालाचा मृत्यू झाल्याची घटना कडा येथील कृषी उपउत्पन्न बाजार समिती परिसरात सोमवारी घडली. दादासाहेब पंढरीनाथ भिताडे ( वय 40) असे मृत हमालाचे नाव आहे.

तालुक्यातील कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बी. के. पोखरणा यांच्या आडतीवर दादासाहेब भिताडे हमालाचे काम करत होते. सोमवारी आडतीवर कापसाने भरलेला टेम्पो आल्याने वजन करण्यासाठी हमाल भिताडे टेम्पोसोबत वजनकाट्यावर गेले. वजनाची पावती घेऊन भिताडे आडतीकडे परतत असताना चालकाने वेगाने टेम्पो मागे घेतला. त्यावेळी हमाल भिताडे चालकाला दिसला नाही. त्यामुळे टेम्पोखाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व एक मूलगा असा परिवार आहे. या अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला आहे.