चंद्रपूरात वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू

546

चंद्रपूरात वाघाकडून रानात जाणाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. चंद्रपूरातील मेंडकी येथील कक्ष क्रमांक 136 मधील जंगवात गुरे चरण्यासाठी नेलेल्या एका गुराख्यावर वाघाने हल्ला केला आहे. वाघाच्या या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू झाला आहे. ब्रह्मपुरी वनविभागाच्या उत्तर ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र अंतर्गत मौजा परसोडी(शिवसागर तुकुम)येथील अण्णाजी नारायण कुथे गुरे चरण्यासाठी मेंडकी राउंड बिट मेंडकी येथील कक्ष क्रमांक 136 मधील जंगलात गेले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या