केजमध्ये तरुणाचा पाण्यात वाहून मृत्यू; दोघे बचावले

sunk_drawn

जोरदार पावसाने केज तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा आहे. पूल वाहून गेले आहेत, रस्ते पाण्यात आहेत, बंधारे फुटले आहेत ,नागरिक भयभीत आहेत, पुराच्या पाण्यात वाहून मंगळवारी एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जण सुदैवाने बचावले आहेत.

अरनगाव (ता. केज) येथील तीन तरुण शेतकरी शेतातून गावी जात होते. त्यातील बाळासाहेब तुकाराम शिरसाट (वय 25) व अन्य दोघे बंधाऱ्यावरून गावात जात होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघेही वाहून गेले. त्यातील दोघांना बाहेर येण्यात यश आले. पण बाळासाहेब याला बाहेर पडता आले नाही. त्यामुळे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. बाळासाहेबच्या मृत्युने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या