OnePlus Nord 2 चा नवीन एडिशन लवकरच होणार हिंदुस्थानात लॉन्च, किंमत असेल…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात लवकरच OnePlus Nord 2 चा Pac-Man Edition लॉन्च होणार आहे. या नवीन फोनच्या लाँचिंगसाठी OnePlus Amazon इंडियावर एक डेडिकेशन पेज पब्लिश करण्यात आले आहे. यामध्ये या फोनची किंमत देखील जाहीर करण्यात आली आहे. कंपनीने याच वर्षी जुलै महिन्यात OnePlus Nord 2 हिंदुस्थानात लॉन्च केला होता. आता कंपनी याचा नवीन व्हॅरिएंट लॉन्च करणार आहे.

OnePlus Nord 2 Pac-Man Edition साठी अ‍ॅमेझॉनवर बनवण्यात आलेल्या पेजवर या स्मार्टफोनची किंमत 37,999 रुपये इतकी असेल, असे जाहीर करण्यात आले आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मॉडेलपेक्षा याची किंमत जास्त असणार आहे. बाजारात उपलब्ध OnePlus Nord 2 ची किंमत 27,999 रुपये इतकी आहे. याचा नवीन व्हॅरिएंट यापेक्षा 10,000 रुपयांनी महाग असणार आहे.

OnePlus Nord 2 Pac-Man Edition ला 12GB रॅप + 256GB स्टोरेजसह लॉन्च केले जाऊ शकते, अशी अपेक्षा केली जात आहे. असं असलं तरी अद्याप याच्या फीचर्स आणि डिझाइन संबंधित कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. येणाऱ्या काही दिवसात याबाबत अधिक माहिती समोर येऊ शकते.

या नवीन व्हॅरिएंटमध्ये Pac-Man चे वॉलपेपर आणि थीम्स पाहायला मिळू शकते. तसेच यात हा गेम आधीच प्री-लोडेड असू शकतो. कंपनी फोनसोबत युनिक रिटेल बॉक्स देऊ शकते. या नवीन व्हॅरिएंटमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर दिला जाऊ जाऊ शकतो.