वरमाळा कांद्याची आणि भेटीही कांद्याच्याच, एका लग्नाची अजब गोष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांद्याच्या वाढत्या दरामुळे सामान्य जनतेच्या नाकीनाऊ आणले आहेत. सध्या कांद्याचा भाव इतका वाढला आहे की लोकांना कांदा सोन्यापेक्षाही महाग वाटू लागला आहे. कांद्याच्या या वाढत्या दरांचा निषेध करण्यासाठी चक्क एका जोडप्याने त्यांच्या लग्नात कांद्याच्या वरमाळा एकमेकांना घातल्या आहेत. तसेच त्यांना लग्नात नातेवाईकांनी भेट म्हणून देखील कांदे व लसूनाच्या टोपल्या भेट दिल्या आहेत.

‘कांद्याचे भाव गेल्या महिनाभरापासून गगनाला भिडले आहेत. त्यामुळे लोकांनी आता कांद्याला देखील सोन्याचा दर्जा दिला आहे. या लग्नात सोने चांदी देण्याऐवजी लोकांना नवदांम्पत्याला कांदे देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. असे करून लोकांनी सरकारचीच खिल्ली उडवली आहे. तसेच नवरा नवरीने कांद्याचे हार घालून सरकारचा निषेध केला आहे’, असे समाजवादी पार्टीचे नेते कमल पटेल यांनी सांगितले.

सध्या देशभरात कांद्याचा भाव 120 ते 200 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे अनेक घरात तसेच हॉटेलमधून कांदा कमी वापरला जात आहे. कांद्याने दराने डोळ्यात पाणी आणलेले असतानाच सोशल मीडियावर मात्र कांद्यावरील मिम्सने लोकांना हसविले आहे. कांद्याच्या वाढत्या भावाची खिल्ली उडवणारे व्हिडीओ, फोटोज लोकांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.