
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या दरात आज सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. कमाल दर १७६२ ते २१८६ रूपये प्रतिक्विंटलवर आला आहे.
अनेक राज्यांमध्ये स्थानिक कांदा बाजारात आल्याने नाशिकच्या कांद्याची मागणी कमी झाली आहे. निर्यातबंदीचाही फटका बसल्याने दरात घसरण सुरू आहे. पिंपळगाव बसवंत व येवला बाजार समितीत आज सर्वाधिक अठरा हजार क्विंटल आवक होती. मनमाड येथे १७६२ रूपये क्विंटल कमाल दर होता, तो जिल्ह्यातील सर्वात कमी भाव ठरला. दिंडोरी येथे कालच्या तुलनेत चारशे रूपयांनी कमाल दर खाली आला, तो २२०० रूपये पुकारला गेला. सरासरी दर १३०० ते १६०० रूपये क्विंटल असा होता.
जिल्ह्यातील बाजार समितीनिहाय किमान, कमाल व सरासरी दर क्विंटलमध्ये पुढीलप्रमाणे:
लासलगाव- ६००-१९३१-१६००;
पिंपळगाव- १२००-२१८६-१६५१;
उमराणे- ७०१-१८००-१६००;
अंदरसूल- ७००-१८०१-१५५०;
मनमाड- ५००-१७६२-१५००;
दिंडोरी- १०००-२२००-१६५०





























































