अत्यल्प दरामुळे कांदा चाळीमध्ये पडून; सटाणा, कळवण तालुक्यातील शेतकरी चिंतेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, सटाणा

डाळिंबाला 25 ते 30 रुपये प्रतिकिलो असा अत्यल्प भाव मिळत आहे. टोमॅटोलाही भाव नसल्याने त्याचाही लाल चिखल होत आहे. मक्याची खरेदी हमीभावाने केली जाईल, असे आवाहन केले जात असले तरी खरेदी केंद्र बंद आह़े कमी भावाने मका विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आत्तापर्यंत 80 टक्के कांदा बाजारात विकला गेला असून अद्याप कळवण, सटाणा, मालेगाव,देवळासह इतर तालुक्यात सुमारे सहा ते सात लाख क्विंटल कांदा चाळीमध्ये पडून आहे. या कांद्याला अत्यल्प असा 150 ते 350 रुपये सरासरी भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे.

कसमादे भागासह जिल्ह्यात एकाही नगदी शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून रोजच कुठे ना कुठे शेतकरी आंदोलनाचा भडका उडत आहे. जिह्यातील बहुतांश भागात यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाशी मुकाबला करताना कांदा, मका, टोमॅटो व इतर भाजीपाला अशा एकाही नगदी शेतमालाला शेतकऱयांना परवडेल असा भाव नाही. त्यामुळे दुष्काळात होरपळून शेतकऱयांचे अर्थकारण पूर्णतः कोलमडले आहे. याचा रोष विविध प्रकारच्या आंदोलनातून तसेच सोशल मीडियातून व्यक्त होत आहे.

गेल्या सात-आठ महिन्यांपासून ज्या उन्हाळ कांद्याच्या भाववाढीकडे शेतकरी डोळे लावून बसले होते. तो उन्हाळ कांदा चाळीतच सडला आहे. उलट भाववाढीऐवजी कांद्याचे दर कमी होत आहेत. त्यामुळे शेतकऱयांचा संयम सुटला आहे. डाळिंबाला 25 ते 30 रुपये प्रतिकिलो असा अत्यल्प भाव मिळत आहे. टोमॅटोलाही भाव नसल्याने त्याचाही लाल चिखल होत आहे. मक्याची खरेदी हमीभावाने केली जाईल, असे आवाहन केले जात असले तरी खरेदी केंद्र बंद असल्याने इतर ठिकाणी उदासीनता असल्याने कमी भावाने मका विकण्याची वेळ शेतकऱयांवर आली आहे. आत्तापर्यंत 80 ते 85 टक्के कांदा बाजारात विकला गेला असून आणखी कळवण, सटाणा, मालेगाव, देवळासह इतर तालुक्यात सहा ते सात लाख क्विंटल कांदा चाळीमध्ये पडून आहे. या कांद्याला अत्यल्प 150 ते 350 असा सरासरी भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे.