अकरावी ऑनलाइन प्रवेश, विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल तरच विशेष फेरीत संधी

391

अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या विशेष फेरीत सहभागी होण्यासाठी यंदा विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जात विशेष फेरीत सहभाग घ्यायचा आहे की नाही, हे आधीच स्पष्ट करावे लागणार आहे. जर विद्यार्थ्यांना विशेष फेरीत सहभागी व्हायचे नसल्यास त्यांच्या प्रवेश अर्जाचा विशेष फेरीच्या गुणवत्ता यादीत विचार केला जाणार नाही.

अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत अर्ज करणारे विद्यार्थी अनेकदा आयटीआय तसेच इंजिनियरींगच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. मात्र या विद्यार्थ्यांचा अकरावीचा अर्ज प्रवेशप्रक्रियेत कायम असतो. त्यामुळे दरवर्षी प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोंच्या घरात दिसते. पण प्रत्यक्षात तसे नसून अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत प्रवेश न घेतलेले विद्यार्थी अनेकदा इतर अभ्यासक्रमांना किंवा मुंबईबाहेरच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेताना दिसतात. अकरावी ऑनलाईनसह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ट्राय करणाऱया विद्यार्थ्यांना यंदा प्रथमच विशेष फेरीत सहभागी होण्यासाठी आधी आपली संमती कळवावी लागणार आहे.

अकरावीच्या नियिमत प्रवेशफेऱयानंतर होणाऱ्या विशेष फेरीत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशफेरी आधी निर्णय घ्यावा लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या विशेष फेरीत सहभागी व्हायचे नाही त्या विद्यार्थ्यांचे अर्ज जैसे थे ठेवण्यात येणार आहे. त्यांना त्या फेरीत प्रवेशाची संधी मिळणार नाही. या विद्यार्थ्यांना दुसऱया विशेष फेरीत सहभागी व्हायचे असेल तर काही नियमांच्या अधीन राहून या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या