ऑनलाईन क्लास सुरू झाल्यास अमेरिकेत राहू नये, हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना फटका

1838

ऑनलाईन क्लासेस सुरू झाल्यानंतर विदेशातील विद्यार्थ्यांनी अमेरिकेत राहू नये. विद्यार्थ्यांनी आपआपल्या देशात जावे. अन्यथा व्हिसा रद्द करून जबरदस्तीने ‘डिपोर्ट’ करू, असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने दिला आहे. यामुळे अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या हजारो हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे. त्यांचे पालकही चिंतेत आहेत.

कोरोना महामारीमुळे जगभरात शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. शालेय शिक्षणापासून विद्यापीठांपर्यंत शिक्षण बंद आहे. जगभरातील अनेक विद्यापीठांच्या परीक्षा रद्द झाल्या किंवा पुढे ढकलल्या आहेत. ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक कहर आहे. या काळात जगभरातील लाखो विद्यार्थी अमेरिकेत अडकले असतानाच इमिग्रेशन आणि सीमा शुल्क अंमलबजावणी यंत्रणेने केलेल्या घोषणेमुळे विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे.

काय आहे आदेश?

– ज्या विद्यापीठांत, कॉलेजमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. तेथील विदेशी विद्याथ्र्यांनी अमेरिका सोडून जावे नाहीतर त्यांना हद्दपार करू. तसेच त्यांचा व्हिसाही रद्द करण्यात येईल.
– ऑनलाईन शिक्षण कोठूनही घेता येते. त्यासाठी अमेरिकेत राहण्याची गरज नाही.
– ऑनलाईन शिक्षण असल्याने अमेरिकेत नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही.
– यापूर्वीही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिका फस्र्टचा नारा देताना एल-१, एच-१बी, एच-२ बी आणि जे-१ व्हिसामध्ये बदल केले आहेत. र्
– अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी जगभरातील विद्यार्थ्यांचा ओढा असतो. इंजिनीअरिंग, मेडिकल, व्यवस्थापन, अर्थशास्त्र, कला आदी शिक्षणासाठी विद्यार्थी येथे प्रवेश घेतातर्
– चीनचे ४७८७३२ तर हिंदुस्थानातील २५१२९० विद्यार्थी अमेरिकेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या