
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
मी बँकं ऑफ इंडियाच्या कस्टमर केअरमधून राहूल वुᆬमार बोलतोय तुमचे एटीएम कांर्ड मी चालू करुन देतो असे सांगून बँकं ऑफ इंडियाच्या एटीएम कांर्डवरील 16 आकंडी नंबर मागून एकां तरुणाला तब्बल 79,005 रुपयांना गंडा घातला
तुषार मारुती मांडवकंर, वय 24, ऱा कोंळंबे याला मोबाईलवर फोन आला मी बँकं ऑफ इंडियाच्या कस्टमर केअरमधून राहूल कुमार बोलतोय तुमचे एटीएम कार्ड मी चालू करुन देतो तुमच्या एटीएम कांर्डवरील 16 आकंडी नंबर मला द्या असे सांगून मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर घेतला आणि अन्य दुसर्या या एका बँकेचे एटीएम कांर्ड नंबर सांगा असे सांगून त्याच्याकंडून कॅथरीन सायरन बँकेचा 16 आकडी क्रमांक घेतला बँकं ऑफ इंडियाच्या खात्यातून 11 हजार 430 रुपये आणि कॅथरीन सायरन बँकेच्या खात्यातून 67 हजार 775 रुपये कांढून ऑनलाईन खरेदी केल्याची फिर्याद तुषार मांडवकंर यांनी दिली आहे.
एक्सीस बँकेतून बोलतोय सांगून 34 हजाराला लुबाडले. रमेश सावंत यांच्या मोबाईलवर एक फोन आला मी ऍक्सीस बँकेतून बोलतोय मला क्रेडीटकांर्ड संदर्भात तपासणीसाठी माहिती हवी आहे, असे सांगून सावंत यांच्याकंडून 16 आकडी क्रमांक मागून घेतला आणि त्यांच्या खात्यातील 34 हजार रुपयांची रक्कम चोरट्याने काढून घेतली रत्नागिरी हर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.




























































