
मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या व्हर्च्युअल क्लासचा फायदा राज्यभरातील विद्यार्थ्यांना होणार आहे. व्हर्च्युअल क्लासच्यामाध्यमातून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास लवकरच सुरू होणार आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिका शाळांमध्ये शिकविणाऱ्या तंत्रस्नेही शिक्षकांनी अभ्यासक्रमाकर आधारित तयार केलेले पाकर पॉइंट प्रेझेंटेशन, धडय़ावर आधारित व्हिडीओ राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या शाळा बंद आहेत. त्यामुळे घरीच अभ्यासाचे धडे गिरविणाऱया विद्यार्थ्यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एमएससीईआरटी) अभ्यासाचे ई-साहित्य तयार करीत आहेत. हे ई-साहित्य तयार करण्यासाठी एमएससीईआरटीला मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचे सहकार्य लाभले आहे. व्हर्च्युअल क्लासमधील रेकॉर्डींग केलेले अभ्यासक्रमावर आधारित शिक्षकांचे व्हिडीओ राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी यूटय़ूब चॅनेलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे.
राज्यभरात मुंबई महापालिकेच्या शिक्षकांची ओळख बनली
सध्या व्हर्च्युअल क्लास सेंटर बंद असल्याने पालिकेच्या 200 तंत्रस्नेही शिक्षकांची टीम घरातून अभ्यासाचे ई-साहित्य तयार करीत आहे. मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांबरोबरच राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना पालिका शिक्षकांचे मार्गदर्शन मिळत असेल तर ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. व्हर्च्युअल क्लासमुळे पालिकेच्या शिक्षकांना राज्यभरात नवी ओळख मिळाली याचा विशेष आनंद आहे. – महेश पालकर, शिक्षणाधिकारी, महापालिका
मुंबई महापालिकेच्या सहकार्याने तयार केलेली यूटय़ूब चॅनेल
n मराठी माध्यम इ. 1 ली ते इ. 7 वू
Channel चे नाव- SCERTMH Marathi Medium Class 1 to 7
https://www.youtube.com/channel/UCWiEAHa31TYXjV36P2uIOxg
– मराठी माध्यम इ.8 ते इ. 10वी
Channel चे नाव – SCERTMH Marathi Medium Class 8 to 10
https://www.youtube.com/channel/UCH9SeVEZteZliA3Eb3uHB4w
– उर्दू माध्यम इ. 1 ते इ. 7वी
Channel चे नाव — SCERTMH Urdu Medium Class 1 to 7
https://www.youtube.com/channel/UC9GxDTgdlD9uc0BcUPKfWHg
n उर्दू माध्यम इ. 8 ते इ. 10वी
Channel चे नाव – SCERTMH Urdu Medium Class 8 to 10
https://www.youtube.com/channel/UCtjhPV_jp16h68e3FteKMbQ





























































