पीएफवरील व्याजदरात केवळ 0.5 टक्के वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्मचारी भाविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफवर 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 8.15 टक्के व्याजदर मिळणार आहे. देशभरातील सात कोटींपेक्षा जास्त कर्मचाऱयांना याचा लाभ मिळेल. दरम्यान 2021-22 या वर्षाच्या तुलनेत ही वाढ केवळ 0.5 टक्के एवढीच आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) मार्च महिन्यांत 8.15 टक्के व्याजदर ठेवण्याचा प्रस्ताव पेंद्र सरकारकडे दिला होता. पेंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे पाठविला. आज या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून नवीन व्याज दराचे पैसे खातेधारकांच्या ईपीएफ अकाऊंटमध्ये जमा होणार आहेत.