बीड जिल्ह्याला दिलासा; 11 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू, 53 अहवालांची प्रतीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यात चार दिवसानंतर धारूर तालुक्यातील एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळला. कोरोनाबाधितांची संख्या 66 वर गेली असली तरी 54 जण कोरोनावर विजय मिळवत घरी परतले आहे. शनिवारी सकाळी अजून एक रूग्ण बरा झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळेजिल्ह्यात आता केवळ 11 रूग्णांवर उपचार सुरू आहेत तर जिल्हाभरातून शनिवारी सकाळी 53 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

बीड जिल्ह्यात धारूर तालुक्यातील एक रूग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर रूग्णांची संख्या 66 झाली आहे. आतापर्यंत 55 जणांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. बीडच्या जिल्हा रूग्णालयात आता केवळ 11 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी सकाळी 53 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यामध्ये बीडमधील 18, अंबाजोगाईतील 18, केजमधील 5, आष्टीतील 6, परळीतील 7 आणि गेवराईहून 1 असे स्वॅब पाठवण्यत आले आहेत. बीड जिल्ह्याला या 53 स्वॅबच्या अहवालांची प्रतिक्षा आहे.