
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारकडून 31 मार्चची अखेरची तारीख सरकारने दिली आहे. मात्र अद्याप 50 टक्क्याहून अधिक लोकांनी आधारला पॅन कार्ड लिंक केलेले नाही. त्यामुळे जवळपास 19 कोटीहून अधिक पॅनकार्ड रद्द होणार असल्याचे समजते.
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे(सीबीडीटी) अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी आजतकला दिलेल्या माहितीनुसार, ‘देशभरातआयकर विभागाने 42 कोटी जनतेला पॅनकार्ड दिले आहेत. त्यातील 20 कोटी पॅनकार्ड आधारला लिंक करण्यात आले आहेत. तर इतर 10 कोटीहून अधिक पॅनकार्ड जर 31 मार्च पर्यंत लिंक केले नाहीत तर त्यांचे पॅनकार्ड बंद होऊन जातील. त्यामुळे आपले पॅन कार्ड तुम्ही लिंक केले नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. तत्काळी आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करा.























































