राम मंदिर शिवसेनाच उभारू शकते, कोणी अडवण्याच्या भानगडीत पडू नये!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बद्रीनाथ खंडागळे । पैठण

“राममंदिर उभारणीचा सोईस्कर विसर पडलेल्या भाजपा सरकारवर आता आमचा विश्वास राहिला नाही. शिवसेनाच प्रभुरामचंद्रांचे मंदिर उभारू शकते, यात तीळमात्र शंका नाही. विजयादशमी नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा विभागातील संपूर्ण वारकरी संप्रदाय हजारो संतमहंत व वारकरी हे अयोध्येत मंदिर निर्माण कार्यात सहभागी होणार आहे. कोणी अडवण्याच्या भानगडीत पडू नये अन्यथा “भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी देऊ काठी !” या तुकोबांच्या संतवचनाप्रमाणे प्रतिकार केला जाईल, असा इशारा जागतिक वारकरी शिखर परिषद (मुंबई)चे अध्यक्ष तथा “माऊली” जन्मक्षेत्र आपेगाव (पैठण) येथील मंदिर संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी दिला आहे. विदर्भ व मराठवाड्याच्या अध्यात्म क्षेत्रातील मान्यवरांच्या बैठकीत ते बोलत होते.

टाळ-मृदंगाच्या गजराने रामजन्मभूमी दुमदुमणार, हजारो वारकरी अयोध्येत धडकणार

चितेपिंपळगाव ( ता.जि. संभाजीनगर ) येथील “जिजाऊ गोमाता धाम” या गुरु विष्णूमाऊली ज्ञानपीठ संस्थेच्या गोशाळे ही बैठक घेण्यात आली. अयोध्येत श्रीराम मंदिराच्या ऊभारणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विजया दशमीनंतर देशभरातील वारकरी अयोध्येत धडकणार आहेत. शिवसेनेच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून विषेशतः अध्यात्म क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी जोरदार स्वागत केले आहे. या बैठकीत नागपूर, यवतमाळ, वाशिम, जळगाव, अकोला, नगर, व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील मठाधिपती, हभप, व मंदिर संस्थानप्रमुख हजर होते. जवळपास 25 हजार वारकऱ्यांच्या सोबत अयोध्येला रवाना होण्याबाबत या प्राथमिक बैठकीत नियोजन करण्यात आले.

या महत्त्वपूर्ण बैठकीस अक्रुर महाराज साखरे, दीपक बादाडे (बीड), निवृत्ती महाराज लकडे, महादेव महाराज गीरी (जालना), शिवाजी महाराज सेलुकर, मनिकानंद स्वामी (परभणी), पुरूषोत्तम महाराज पाटील, नितेषानंद बारसकर (नांदेड), अरुण महाराज मोरे, राजु महाराज देशमुख (धाराशिव), जगदीश महाराज सोनवणे, गीतांजली महाराज केंद्रे (लातूर), महेश महाराज कळंबे (नागपूर), वासुदेव थोरात (अकोला), गोपाळ महाराज काजरे, अश्विन महाराज कासारे (यवतमाळ), गजानन महाराज मवाळ, पुरूषोत्तम जामोद (बुलढाणा), प्रसाद महाराज खंडारे, कल्याण महाराज सावळे (हिंगोली), ज्ञानेश्वर महाराज गळशीकर, जनार्दन महाराज राजपूत (जळगाव), व रामदास महाराज बळी (निवृत्त ऊप-जिल्हाधिकारी, वाशीम) यांच्यासह. संभाजीनगर जिल्ह्यातील हभप उपस्थित होते.