Operation Sindoor- पाकिस्तानसाठी हिंदुस्थानच्या लेकी पुरेशा! विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांच्या ब्रीफिंगमधून अनोखा संदेश

हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ ब्रीफिंग करण्याची जबाबदारी विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी केले. जम्मू आणि कश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुस्थानने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल हिंदुस्थानच्या आजच्या ब्रीफिंगमध्ये एक मजबूत आणि महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आलेला आहे. विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी या दोन महिला अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर लष्कराच्या अचूक हल्ल्यांची माहिती दिली.

‘ऑपरेशन सिंदूर’ या नावासोबत दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या महिलांना एकप्रकारे श्रद्धांजली देण्यात आली. मुख्य म्हणजे या ब्रीफिंगचे नेतृत्व करण्यासाठी महिला अधिकाऱ्यांची निवड हे एक शक्तिशाली पाऊल म्हणून प्रशंसा करण्यात येत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानमध्ये कोणत्याही लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले नाही,” असे कर्नल सोफिया कुरेशी यांनी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यानंतर बोलताना सांगितले.

विंग कमांडर व्योमिका सिंग म्हणाल्या, हिंदुस्थानने आपल्या प्रत्युत्तरात बराच संयम दाखवला आहे. पाकिस्तानने केलेल्या कोणत्याही चुकीच्या कृतीला उत्तर देण्यासाठी हिंदुस्थानी सशस्त्र दल पूर्णपणे तयार आहे. विंग कमांडर व्योमिका सिंग ही भारतीय हवाई दलात (IAF) एक प्रतिष्ठित हेलिकॉप्टर पायलट आहे. त्या राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (NCC) मध्ये सामील होऊन नंतर त्यांनी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. व्योमिका सिंह यांनी जम्मू आणि काश्मीर तसेच ईशान्येकडील उंचावरील क्षेत्रांसह हिंदुस्थानातील आव्हानात्मक प्रदेशांमध्ये ‘चेतक’ आणि ‘चित्ता’ सारखी हेलिकॉप्टर चालवली आहेत. विंग कमांडर सिंग यांनी अनेक बचाव मोहिमांमध्येही भाग घेतला आहे. कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय लष्कराच्या सिग्नल कॉर्प्सची एक सन्मानित अधिकारी आहेत. पुण्यातील बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व करणारी ती पहिली महिला अधिकारी आहे.

हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये मुझफ्फराबाद, कोटली, बहावलपूर, रावळकोट, चकस्वरी, भिंबर, नीलम व्हॅली, झेलम आणि चकवा या नऊ ठिकाणी 24 क्षेपणास्त्र हल्ले केले. हा हल्ला बुधवारी 6 मे रोजी पहाटे 1.05 वाजता सुरू झाला आणि फक्त 25 मिनिटे चालला.