एकांकिका पाहण्याची संधी, विनय आपटे प्रतिष्ठानचा उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवंगत अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक विनय आपटे यांच्या जन्मदिनानिमित्त विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे 17 जूनला एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विनय आपटे प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमात नुकत्याच झालेल्या विविध एकांकिका स्पर्धेत अनेक पारितोषिके मिळवणाऱ्या जिर्णोद्धार आणि स्टार या दोन एकांकिकांचे प्रयोग सादर होणार आहेत.

अभिनेते-दिग्दर्शक अरुण नलावडे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अभिनय, कल्याण या संस्थेची निर्मिती असलेल्या जीर्णोद्धारचे लेखक अभय नावाथे तर दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव आहेत. जिराफ थिएटर्स या संस्थेची निर्मिती असलेल्या स्टार या एकांकिकेचे लेखक आणि दिग्दर्शक राकेश जाधव आहेत. शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजता, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड पश्चिम येथे हा कार्यक्रम सादर होणार असून प्रवेश विनामूल्य आहे