लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर, 118 खासदारांच्या सह्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विरोधी पक्षाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची नोटीस जारी केली आहे. या नोटीसीवर विरोधी पक्षातील 118 खासदारांच्या सह्या आहेत. मंगळवारी लोकसभा सचिवालयाला तशी नोटीस दिली आहे.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरू झालेला राजकीय संघर्ष सुरुच असून गेल्या आठवडाभरात लोकसभेतील कामकाजाचा यावर मोठा परिणाम झाला आहे.