
सोशल मीडियावर एखादा फोटो किंवा व्हिडिओ अपलोड केल्यावर त्याला लाइक्स आणि कमेंट्स किती मिळतायत, याकडे सर्वांचे लक्ष असते. काही केळा कमी लाइक्स मिळाल्यावर युजर निराश होतात. आता लाइक्सच्या कटकटीपासून सर्वांची सुटका होणार आहे. इन्स्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर आणण्याची घोषणा केली आहे. या फीचरद्वारे इन्स्टाग्राम युजर त्यांच्या पोस्टवर आलेल्या लाइक्स आपल्या मर्जीनुसार हाईड करू शकणार आहेत.
इन्स्टाग्रामकडून गेल्या काही काळापासून या फीचरची चाचणी सुरू होती. कंपनीने बुधकारी याची अधिकृत घोषणा केली आहे. येत्या काही दिवसांत फेसबुकसाठीही हे फीचर लॉन्च करण्यात येणार आहे. यामुळे कोणाच्या पोस्टवर किती लाइक्स आहेत तसेच आपल्या पोस्टवर किती लाइक्स आहेत हेदेखील इतर कोणी पाहू शकणार नाही.
- हाईड लाईक काऊंट फीचर वापरण्यासाठी आधी आपल्या इंस्टाग्रामच्या सेटिंग्जकर जा. तिथे न्यू पोस्ट सेक्शनमध्ये जा. हाईड लाईक काऊंट या पर्यायावर क्लिक करा. यावर क्लिक करताच हे फीचर आपल्या सर्व पोस्टवर लागू केले जाईल.





























































