दिग्गज कंपनीने केली शेकडो कर्मचाऱ्यांची कपात, ऑफर लेटरही परत घेतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्यावर्षीपासून आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात सुरू आहे. अॅमेझॉन, गुगल, ट्विटर, फेसबुक या कंपन्यांनी कर्मचारी कपात केल्यानंतर आता ओरॅकल कंपनीने कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने शेकडो कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

एका अहवालानुसार, ओरॅकल कंपनीने आपल्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले आहे. एवढेच नाही तर त्यांना सोबत गुलाबी रंगाची एक पावतीही दिली आहे. त्यांच्याकडून ऑफर लेटरही परत घेतले आहे. ओरॅकल कंपनीने कर्मचाऱ्यांच्या कपातीबरोबरच पगारवाढ, प्रमोशन करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. तसेच त्यांना वर्षभर याच अटींवर काम करावे लागणार असल्याचे कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. तसेच कंपनीतील मार्केटींग, इंजिनीअर, अकाऊंट्स आणि प्रोडक्शन विभागातील कर्मचाऱ्यांनाही कामावरुन कमी करण्यात आले आहे. मात्र याबाबत ओरॅकल कंपनीकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

ओरॅकलच्या कर्नर डिव्हिजनने रुग्णांची आरोग्य माहिती संग्रहित करण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या इलेक्ट्रॉनिक प्रणालींची देखभाल आणि सुधारणा करण्यासाठी यूएस डिपार्टमेंट ऑफ वेटरन्स अफेअर्स ऑफिसशी करार जिंकला. तथापि, कर्नर सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे अनेक रुग्ण प्रभावित झाल्यानंतर यूएस संरक्षण विभागाने करार स्थगित ठेवला. आरोग्य विभागातील टाळेबंदी यूएस विभागातील दिग्गजांसह कर्नरच्या अडचणीत असलेल्या भागीदारीशी संबंधित असू शकते.