
कधीकाळी सहजपणे झाडाझुडपांमध्ये सापडणारे मधमाश्यांचे पोळे म्हणजेच ‘मोहोळ’ सापडणेही आता दुर्मिळ झाले आहे. मधमाशा घटल्याने मोहोळ दिसेनासे झाल्याचे मुख्य कारण म्हणजे मधमाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने त्याचा थेट परिणाम फळबागांवर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बागेत कृत्रिम मधमाशी पेट्या लावून फुलांचे परागीभवन वाढून फळधारणा चांगली होण्यासाठी शेतकऱ्यांनी कृत्रिम पद्धतीने मधमाशांचे पालन करून फळबागा फुलवण्यासाठी आटापिटा सुरू असून एकूण शेतीचे गणितच बिघडले आहे.
एकीकडे रासायनिक कीटकनाशके व वाढत्या फवारण्यांचे दुष्परिणाम तर दुसरीकडे पर्यावरणातील बदल अशा दुहेरी फटक्यामुळे मधमाशी संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. मधमाशी परगीकरणासाठी महत्त्वाचे असल्याने जोपर्यंत मधमाशी फुलांवर बसून परागीकरण होत नाही, तोपर्यंत फळधारणा होत नसल्याने त्याचा फटका थेट, आंबा, डाळिंब, मोसंबी, लिंबू फळबागांवर होत आहे. आता फळबाग परागीकरण होण्यासाठी शेतकरी कृत्रिम मधमाशांच्या पेट्या फळबागेत ठेवाव्या लागत आहेत. यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत असून, अपेक्षित परागीकरणही होत नसल्याचे दिसून येत आहे. अशा मधमाशांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने मधमाश्याच्या एका पेटीची किंमत पाच हजारांच्या घरात पोहोचली आहे. एकरी दोन तीन पेटचा ठेवाव्या लागतात. मधमाश्यांना हवामान मानवले नाही, तर त्याही मरतात, ही वस्तुस्थिती आहे.
मोहोळच्या पोतळ्यामध्ये राणी माशी नवीन अंडी घालते. कामकरी माश्या अमृत (मध) गोळा करते, पोळे सांभाळणे व नर माशा राणी माशीचे फलन करत असतात. मेणाचे पोळे बनवून त्यात मध साठवतात, जे हजारो माशांचे घर असते.
नैसर्गिक मधमाश्या कमी झाल्यामुळे आंबा, डाळिंब, मोसंबी यासारख्या फळबागांमध्ये परागीभवन होत नाही. ज्यामुळे फळांची संख्या आणि गुणवत्ता कमी होते. मधमाशी म्हणजे परागण आणि मध निर्मितीमधला अत्यंत महत्त्वाची घटक. राणी माशी, कामकरी आणि नर माशांच्या स्वरूपात पोळ्यात राहते. परागकण नीट होत नाही फुले, वनस्पतींचे परागण करून फळे व भाज्यांच्या वाढीस मदत करते, फळबागांमध्ये उत्पादन वाढते. पूर्वी मधमाश्यांचे थवे मोठ्या प्रमाणात नजरेस पडायचे; मात्र शेतीतून अधिक उत्पन्न मिळावे, याकरिता बेसुमार रासायनिक खतांचा वापर, विविध फवारण्या यामुळे मधाचा पोळे दुर्मिळ होऊ लागले आहेत.
कीटकनाशकांचा वापर अन्नसाखळी मारक मोसंबी डाळिंब बागेत परागीकरणाचे सुमारे ८० टक्क्यांहून अधिक काम मधमाश्यांमार्फत होते. त्यांच्या केसाळ शरीरामुळे फुलांतील परागकण एका फुलावरून दुसऱ्या फुलावर सहजपणे हस्तांतरित होतात. यामुळे सुमारे ७० टक्क्यांहून अधिक अन्नपिकांच्या उत्पादनात वाढ होऊन फळांचा दर्जाही सुधारतो. याच कारणामुळे बहुतांश डाळिंब व मोसंबी भागात उत्पादक शेतकरी आपल्या बागेत मधमाश्यांच्या पेट्या ठेवून परागीकरणास चालना देतात. मात्र, अलीकडील काळात रासायनिक खतांचा आणि जहाल कीटकनाशकांचा वाढता वापर नैसर्गिक अन्नसाखळीला ठरत असल्याचं शेतकऱ्यांच्या अनुभवातून समोर येत आहे. मोहोळ हा मधमाश्यांनी तयार केलेला एक नैसर्गिक गुलकंद असतो. ग्रामीण भागात याचा वापर औषध म्हणून केला जात असे; मात्र अलीकडील काळात रब्बी हंगामातील फुलोऱ्याची पिके कमी झाल्याने मधमाशांना अन्न मिळत नाहीत. परिणामी, मधमाश्यांचे थवे कमी होत असून, मोहोळ तयार होण्याचे प्रमाणही घटले आहे.
फळधारणा वाढविण्यासाठी कृत्रिम पेट्या विकत आणल्या
मधमाशी संख्या झपाट्याने घटत असून, नैसर्गिक मोहोळ दुर्मिळ झाल्याने मोसंबीच्या बागेत कृत्रिम मधमाशी पेट्यांचा परागीकरण करण्यासाठी आधार चांगल्या फळधारणेसाठी घ्यावा लागत असल्याने पिकांच्या खर्चात वाढ होत आहे. शासनाने मधमाशीचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी ठोस धोरण राबवावे, असे वडीगोद्री येथील शेतकरी सुरेश काळे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी जैविक फवारणी भर द्यावा
मधमाश्यांचे संवर्धन होण्यासाठी तणनाशक, कीटकनाशक रासायनिक खतांचा अतिरेक वापर टाळला पाहिजे. शेतीच्या बांधावर झाडे ठेवून. बांधाचे रुंदीकरण आवश्यक आहे. मधमाशीविना शेती करणे शक्य नाही. त्यामुळे जैविक फवारणी जैविक खतांवर भर द्यावा तरच मधमाशी संख्या वाढेल, असे अंबड सहायक कृषी अधिकारी संकेत डावरे यांनी सांगितले.




























































