लातूरात एकाच कुटुंबातील सहाजणांना केला अवयवदानाचा संकल्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
लातूरातील गायकवाड कुटुंबातील सहाजणांनी अवयवदानाचा संकल्प करुन त्याचे संमतीपत्र भरुन दिले.

सामना प्रतिनिधी । लातूर

जागतिक हृदयरोग दिनानिमित्त येथील ज्ञानेश्वर विद्यालयातील सहशिक्षक दीपक निवृत्ती गायकवाड यांनी आपल्या परिवारासह अवयवदान करण्याचा संकल्प केला.

त्या अनुषंगाने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार अवयवदानाचा अर्ज भरुन दिला. वडील दोन्ही डोळ्यांनी अंध असल्याने एखादा अवयव नसल्यास काय यातना होतात याची जाणीव असल्याने गायकवाड परिवाराने अवयव दान करण्याचा संकल्प केला. यावेळी निवृत्ती गायकवाड, सुमनबाई गायकवाड, अमोल गायकवाड, दीपक गायकवाड, नेहा दीपक गायकवाड, रेखा दिगंबर सिरसाट यांनी अवयव दानाचा अर्ज भरुन दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते उमेश कांबळे, डॉ.चव्हाण, श्रीमती पाटील यांची उपस्थिती होती. या संकल्पनेमुळे गायकवाड परिवाराचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.