
राज्यातील अनाथांना स्वतंत्र शिधापत्रिका मिळावी अशी मागणी अनेक वर्षे केली जात होती. राज्य सरकारने अनाथांना तात्पुरती पिवळी (बीपीएल) शिधापत्रिका वितरण करण्याबाबतचा निर्णय ‘प्राधान्य कुटुंब योजनें’तर्गत घेतला आहे. कोरोना काळात अनाथ झाले आहेत अशा मुलांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
‘प्राधान्य कुटुंब योजनें’तर्गत 28 वर्षांपर्यंतच्या अनाथांना बीपीएल शिधापत्रिकेबरोबर त्याचे लाभ मिळतील व 28 वर्षांवरील अनाथांना उत्पन्नाप्रमाणे शिधापत्रिका मिळेल. या निर्णयामुळे राज्यातील अनाथ मुलांना मोठा आधार मिळेल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.
अनाथांना शिधापत्रिका मिळवताना कागदपत्रांचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी अनाथ असल्याचा पुरावा म्हणून महिला व बालविकास विभागाने वितरित केलेले अनाथ प्रमाणपत्र पिंवा आई व वडील यांचे मृत्यू प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येईल.



























































