गड्याचं काम करणाऱ्या तरुणाची हत्या, खात्यामधून लाखो रुपये गायब

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातल्या खंडु खटाळ या तरुणाच्या मृत्युन वेगळे वळण घेतले आहे. त्याच्या बॅंक खात्यातुन लाखोची रक्कम कांही दिवसात गायब झालीय. त्यामुळे खंडु खटाळ या तरुणाची आमहत्या की हत्या? याचा तपास पोलीस करत असुन या मधे फकराबाद येथील बडे धेंडे अडकल्याने मोठी खळबळ माजली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाशी तालुक्यातील फकराबाद येथील दत्तात्रय बीक्कड यांच्या शेतात गेल्या काही वर्षापासुन खंडु मालु खटाळ (25) हा तरूण व त्याचे वडील मालु खटाळ (रा. हानुमंतवाडी, ता. रेणापुर) हे सालगडी म्हणुन काम करत होते. कुणाच्याही अध्यात मध्यात नसलेल्या खंडु खटाळ या तरुणाचा मृतदेह 26 जुलैला अचानकपणे चिंचेच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला आणि एकच खळबळ माजली.

यावेळी त्याच्या अंगावरील कपडय़ावर रक्ताचे डाग आणि नाकातून रक्त आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद वाशी पोलीस ठाण्यात दाखल केली असली तरी तपास अधिकारी मोसीन पठाण यांनी या संशयित गुढ मृत्युचा छडा लावण्यासाठी आपली चक्रे फिरवली आहेत. डॉक्टरांचा पीएम रिपोर्ट येणे बाकी आहे.

लाखोंची रक्कम खंडुच्या खात्यावरून काढली

खंडु खटाळ हा तरुण सालगडय़ाच्या खात्यावरुन अचानक लाखांची रक्कम काढली गेली असल्याची माहिती खंडूचे वडिल मालु खटाळ यांनी पोलिसांना दिली. खंडु हा सालगडी म्हणुन काम करत असताना त्याच्या खात्यातून अचानक एवढी रक्कम गायब झाल्याने अनेक जण चक्रावुन गेले आहेत. खंडूच्या मृत्यु प्रकरणात अनेक मोठी नावं गुंतलेली असून एका महिलेच्या प्रकरणात फोटो द्वारे या तरुणाला ब्लॅकमेलिंग करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून तरुणाचा खून की आत्महत्या? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत. बँक खात्यातुन एवढी मोठी रक्कम गायब झाली. ती गावात कुणाकडे गेली याचा तपास होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या